सदाभाऊ खोत यांचे “मरळनाथपूर” ता.वाळवा जि.सागंली हे गाव महाराष्ट्रातील पहीले सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून ओळखले जाणार.

0

देवगड,दि.१३ जानेवारी
माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नामुळे राज्याचे ऊर्जा मंत्री तथा उप मुख्यमंत्री नाम,. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली “मरळनाथपूर” या आपल्या गावाला १००% सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून ‘महाराष्ट्रातील पहिला पायलट प्रोजेक्ट’ अशी मंजूरी मिळाली आहे. सदरच्या प्रकल्पामुळे गावातील सर्व घरे, ग्रामपंचायत ऑफिस, पाणीपुरवठा योजना, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक संस्था यांची ऊर्जेची १००% टक्के गरज भागणार असून हे गाव सौरऊर्जा स्वयंपूर्ण होणार आहे.

त्याबद्दल माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा काल मरळनाथपूर गावामध्ये भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सदर प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल सदाभाऊ खोत यांनी राज्याचे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गावाच्या वतीने आभार मानले.