मालवण,दि.२५ फेब्रुवारी
ऐतिहासिक भगवंतगड किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित पोवाडा गायन स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडीने प्रथम क्रमांक पटकवला. द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा गावठणवाडीने, तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा सडेवाडी यांनी प्राप्त केला. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी जिल्हा परिषद शाळा कुंभारवाडी यांची निवड करण्यात आली.
विजेत्या संघाना मान्यवरांच्या हस्ते चषक, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी सिंह गर्जना ग्रुप आचरा, तुर्या ग्रुप ऑफ आर्ट्स-गणेश अपराज यांच्याकडून पारितोषिके पुरस्कृत करण्यात आली होती.
याप्रसंगी चिंदर सरपंच नम्रता महंकाळ-पालकर, प्रकाश मेस्त्री, आशिष कोरगावकर, अजय परब, गणेश गोगटे, दिनेश पाताडे, गणेश गोगटे, सिद्धेश गोलतकर, भूषण दत्तदास, संतोष अपराज, विवेक परब, रोहन वराडकर, सदाशिव गोसावी, संतोष पालकर, प्रणित तावडे, संदीप परब, प्रिया पालकर, पिंट्या दळवी, श्रीकांत कानविदे, श्रेया चिंदरकर, तलाठी- शेजवळ, संतोष जाधव, शिक्षक-पंढरीनाथ करवडकर, स्मिता जोशी, माधुरी पाटील, राजेंद्र चौधरी, राजेंद्रप्रसाद गाड, गंगाराम पोटघन, रतन बुटे, नंदकुमार जुधळे, अमोल खेडेकर, प्रवीण तेली आदी उपस्थित होते.
या स्पर्धेवेळी जिल्हा परिषद शाळा पडेकाप यांनी धनगरी नृत्य सादर केले. परीक्षक म्हणून नवनाथ भोळे व आशिष कोरगावकर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक सिद्धेश गोलतकर यांनी तर सूत्रसंचालन भीमाशंकर शेतसंदी यांनी केले. शेवटी आभार मोरेश्वर गोसावी यांनी मानले.