वेंगुर्ला ,दि.२५ फेब्रुवारी
वेंगुर्ला-राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाच्या ‘गरूडझेप महोत्सव २०२४‘ला २४ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणा-या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नायरा पेट्रोल पंप येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे ४० जणांनी रक्तदान केले. उद्घाटन वेंगुर्ला पोलिस निरीक्षक संदिप भोसले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी स्वतः रक्तदान केले.
उद्घाटनप्रसंगी कलावलयचे अध्यक्ष बाळू खामकर, बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी सतिश डुबळे, माजी नगरसेवक यशवंत किनळेकर, गणपत राऊळ, पोलिस सुरेश पाटील, रेडकर बंधू हॉटेलचे ऋषिकेश रेडकर, जबरदस्त मंडळाचे अध्यक्ष साबाजी राऊळ, सचिव सिद्धेश रेडकर, खजिनदार स्वप्निल पालकर, सदस्य विवेक राफळ, मंगेश परब, अजित राऊळ, अद्वैत आंदुर्लेकर, बापू वेंगुर्लेकर, कौशल मुळीक, ज्ञानेश्वर रेडकर, देवेंद्र रेडकर, अनंत रेडकर, विजय आंदुर्लेकर, अशोक कोलगांवकर, तुषार भाटकर, हितेश सावंत, जावेद शेख, दिनेश पाटील आदी उपस्थित होते. मंडळातर्फे सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.