सावंतवाडी येथील फायनान्स कंपनीमध्ये पैसे अडकलेल्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी मनसे प्रयत्नशील-जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर

सावंतवाडी दि.२५ फेब्रुवारी 
सावंतवाडी शहरात सालईवाडा येथे सुरू करण्यात आलेल्या फायनान्स नावाचे दुकान थाटणारा व त्याच ठिकाणी कमी व्याज दरात पैसे देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा करून फरार झालेला पाटील नामक इसम याच्याकडून फसलेल्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर कसे मिळतील यासाठी मनसे सर्व प्रयत्न करत आहे असे मनसे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांनी सांगितले.

या संस्थेमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी थोडा संयम बाळगावा कारण ज्या पाटील नामक इसमाने एन्टरप्राइजेसच्या स्थानिक लोकांना हाताशी धरून हा कोट्यावधी रुपयांवर घोटाळा केलेला आहे तो इसम अद्याप फरार आहे.तसेच या सर्व घोटाळ्याचा योग्य प्रकारे तपास करण्याचे आवाहन मनसे तर्फे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे यापूर्वीच करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत आता एन्टरप्राइजेसच्या स्थानिक एजंट लोकांनी हे पैसे देण्याची जबाबदारी काही अंशी स्वीकारली असून तसे आश्वासन त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ग्राहकांसमोर दिलेले आहे.

आमिषाला भुलून या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी पुढील ५ ते ६ दिवस संयम बाळगावा या ग्राहकांचे आमिषाला बळी पडून फायनान्स एजन्सी मध्ये अडकलेले पैसे लवकरात लवकर कसे परत मिळतील या साठी आम्ही सर्व तो प्रयत्न करत आहोत असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर ,तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत व विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केले आहे.