सावंतवाडी,दि.२५ फेब्रुवारी
लोकसभा निवडणूक शिवसेना – भाजप महायुती तर्फे लढविली जाणार आहे जर युती च्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे उमेदवार असतील तर शिवसेनेची काही हरकत राहणार नाही मात्र राणे उमेदवार नसतील तर शिवसेनेतर्फे किरण सामंत हेच उमेदवार असतील असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे .
ते म्हणाले,कुठल्याही परिस्थितीत मतदारसंघात बदल दिसेल. खासदार विनायक राऊत यांचा पराभव अटळ आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि दीपक केसरकर यांनी शनिवारी एकाच गाडीतून प्रवास केला. तो संदर्भ देऊन केसरकर म्हणाले, यावेळी नारायण राणे यांनी आपल्या मनात निवडणूक लढवायची नाही. मात्र पक्ष काय सांगतो त्यावर अवलंबून आहे असे त्यांनी सांगितले त्यामुळे त्यांचे वरिष्ठ भूमिका ठरवतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत खासदार विनायक राऊत यांचा पराभव करायचा आहे
नारायण राणे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नसतील तर शिवसेनेचा दावा आहे. शिवसेना पक्षाचे किरण सामंत निवडणूक लढवतील. शिवसेनेचे उमेदवार म्हणून किरण सामंत हेच दावेदार आहेत .मात्र महायुतीतून केंद्रीय मंत्री नारायण यांचे नाव असेल तर किरण सामंत यांचा प्रश्न येत नाही आणि. राणे उमेदवार नसतील तर किरण सामंत आपला दावा करू शकतात असे केसरकर यांनी म्हटले आहे.