सावंतवाडी,दि.२५ फेब्रुवारी
कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) मार्च -२०२४ च्या लेखी परीक्षा दि.०१ मार्च २०२४ ते २८ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहेत. सावंतवाडी केंद्र क्रमांक ८४०५ वरील परीक्षा या कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, मावंतवाडी या प्रशालेत घेण्यात येणार आहेत. सकाळच्या सत्रात सुरु होणाऱ्या लेखी परीक्षा स११.०० वाजता सुरु होणार आल्याने विद्यार्थ्यांनी सकाळी १०.३० वाजता व दुपारच्या सत्रात २.३० वाजता परीक्षा दालनात प्रवेश करणे आवश्यक आहे. यावेळेपुर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. असे केंद्रसंचालक, कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी केंद्र क्र. ८४०५ यांनी कळविले आहे
परीक्षाकेंद्रावरील बैठक क्रमांक B022133-B022432
असा आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.