सह्याद्री नाईक मराठा समाज मंडळाच्या वतीने मान्यवरांचा अण्णा केसरकर यांच्या हस्ते सत्कार

सावंतवाडी दि.२५ फेब्रुवारी 

सह्याद्री नाईक मराठा समाज मंडळ सावंतवाडी यांची वार्षिक सभा कारिवडे भंडारवाडी येथे संपन्न झाली. यावेळी अविनाश नाईक यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सभेत मान्यवरांचा सन्मान दलित मित्र पुरस्कार प्राप्त वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

अविनाश नाईक यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सभेत कार्याध्यक्ष शरद नाईक यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले तसेच ठरावांच्या कार्यवाही बाबत माहिती दिली. या सभेत राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हनुमंत नाईक व खुशी हनुमंत नाईक तसेच पौर्णिमा हनुमंत नाईक आदींचा सन्मान करण्यात आला. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पौर्णिमा नाईक हिने दुसरा क्रमांक पटकावला होता व जलजीवन मिशन अंतर्गत आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक मिळवला तिने हा पुरस्कार प्राप्त करून समाजाची मान उंचावली म्हणून दलित मित्र पुरस्कार प्राप्त वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी समाज अध्यक्ष विनोद नाईक, शरद नाईक, अमित नाईक , आशिष नाईक,प्रकाश नाईक तसेच ज्येष्ठ रामचंद्र साळगावकर, प्रवीण नाईक आदी समाज बांधव उपस्थित होते. हनुमंत लक्ष्मण नाईक यांनी आपल्या शिक्षक पेशातील गावागावातील सामाजिक अनुभव कथन केले हा घरचा सत्कार असल्याने भारावून गेलो असल्याचे सांगितले. आपल्या मुली अभ्यास पूर्ण करून सर्वांना अभिमान वाटेल अशी प्रगती करतील अशी अशा व्यक्ती केली.
शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण नाईक व सिंधुदुर्ग वकील संघटनेचे अध्यक्ष अँड परिमल नाईक यांच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला. सह्याद्रीच्या कुशीतील २० गावातील नाईक मराठा समाज मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते पुढील सामाजिक वाटचालीसाठी या बैठकीत समाजच्या बांधवांनी धोरण निश्चित केले.