आठवडा बाजारात येणाऱ्या परराज्यातील लोकांकडून काटा मारण्याचे प्रकार महागाई मुळे सर्व सामान्य जनता मेटाकुटीला
दोडामार्ग, दि. २५ फेब्रुवारी
देशातील जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारचा वाढत्या महागाई वर अंकुश राहीलेला नाही. तरी अनेक चॅनेलवर फसव्या जाहिराती दाखवून कोटय़वधी जनतेची दिशाभूल केली जात आहे. महागाई मुळे हैराण झालेल्या सर्व सामान्य नागरिकांना रोजच्या जेवणासाठी मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत. रविवारी दोडामार्ग आठवडा बाजारात तीनशे ते चारशे साडेचारशे दर बघायला मिळाले. त्यामुळे मिरची तिकट झाल्याचे दिसून आले. तर काही परराज्यातील मिरची विक्रेते यांच्याकडून फसवणूक केली जाते काटा मारला जातो हा प्रकार समोर आला. एका ग्राहकांने याचा जाब विचारला. वाढत्या दरामुळे सर्व सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. हिच का ? मोदी गॅरंटी असा सवाल उपस्थित होत आहे.