वैभववाडी,दि.१३ जानेवारी
कुंभवडे गावच्या सरपंचपदी भाजपाच्या शिल्पा रवींद्र सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सरपंच मिलिंद गुरव यांनी राजीनामा दिल्यामुळे पद रिक्त झालं होते. निवडणूक प्रशासनाच्या वतीने कुंभवडे ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. सरपंच पदासाठी शिल्पा सावंत यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच प्रमोद सावंत, माजी सरपंच मिलिंद गुरव, उपसरपंच विनोद कदम, ग्रामपंचायत सदस्य नंदू शिंदे, विनया सावंत, चैत्राली चाळके, सुरेखा चव्हाण, पोलीस पाटील अवधूत तळेकर, दिपक सावंत, रवींद्र सावंत, गणपत कदम व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.