मालवण,दि.२५ फेब्रुवारी
शिवसेना (शिंदे गट ) युवती सेना मालवण कुडाळ जिल्हाप्रमुख पदी मालवण येथील सोनाली सर्वेश पाटकर यांची नियुक्ती करण्यात आली असून सौ पाटकर यांना तशा आशयाचे पत्र युवासेना सचिव किरण साळी, दीपेश म्हात्रे यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले आहे
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार शिवसेना पक्षाच्या युवासेनेचे सिंधुदुर्ग जिल्हयातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. त्यात शिवसेना (शिंदे गट ) युवती सेना मालवण कुडाळ जिल्हाप्रमुख पदी मालवण येथील सोनाली सर्वेश पाटकर यांची तर मालवण कुडाळ जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष बाळकृष्ण नाईक यांची तसेच युवती सेना मालवण तालुकाप्रमुख पदी मधुरा तुळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे युवा सेना मध्यवर्ती कार्यालय येथून युवासेना सचिव किरण साळी, दीपेश म्हात्रे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे नियुक्ती जाहीर झाली आहे. अशी माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा माजी सचिव तथा देवबाग जिल्हा परिषद मतदारसंघ पक्ष निरीक्षक किसन मांजरेकर यांनी दिली.