काजूला हमीभाव देण्यास सरकार अपयशी ठोस निर्णय होत नसल्याने रस्ता रोको आंदोलन

 निवडणूकिवर बहिष्कार टाकण्याचा दोडामार्ग येथील बैठकीत निर्णय

दोडामार्ग, दि. २५ फेब्रुवारी 

गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदार शेतकरी यांच्या काजूला कवडीमोल दर देऊन एक प्रकारे चेष्टा केली जात आहे. काजूला दोनशे रुपये हमीभाव मिळावा यासाठी १६ फेब्रुवारी रोजी तालुका तहशीलदार कार्यालय येथे धरणे आंदोलन करून देखील शासन स्तरावर ठोस निर्णय झाला नाही. हे सरकार काजू बागायतदार शेतकरी यांना हमीभाव देण्यास असमर्थ ठरले आहे. तेव्हा या सरकारच्या विरोधात लवकरच रस्ता रोको आंदोलन करून येणाऱ्या निवडणूकिवर बहिष्कार घालण्याचा निर्णय दोडामार्ग येथील बैठकीत घेण्यात आला.

दोडामार्ग तालुक्यातील काजू बागायतदार शेतकरी यांची बैठक रविवारी दोडामार्ग येथे फळ बागायतदार संघ अध्यक्ष विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कृषी विद्यापीठ डॉ. मोहन दळवी, दिवाकर म्हावळणकर, प्रविण परब, लक्ष्मण नाईक, चंद्रशेखर देसाई, अजित देसाई , चंद्रशेखर सावंत, बाळा गवस, आकाश नाईक, संतोष देसाई, संतोष नाईक, सुनिल सावंत, शरद सावंत, राजन देसाई, लाडू गवस, बाबाजी नाईक,
विष्णू नाईक, अमित सावंत, संजय देसाई, नारायण गावडे, आकाश नरसुले, गोपाळ सावंत, इतर पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.