वेत्ये येथील ग्रामस्थांना खाडीपात्रात वृद्ध महिलेचा मृतदेह

सावंतवाडी, दि.२५ फेब्रुवारी

वेत्ये-नमसवाडी (ता. सावंतवाडी)मृत येथून बेपत्ता झालेल्या ७० वर्षीय वृद्ध महिला आरोंदा-शिपेतूवाडी येथील खाडीपात्रात मृतावस्थेत आढळून आली.प्रेमलता मनोहर गावडे असे तिचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी
आपण भटजींकडे जाते, असे आपल्या पुतण्याच्या पत्नीला सांगून गेली होती. सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही,
म्हणून तिचे नातेवाईक तिचा शोध घेत होते. शुक्रवारी रात्री आरोंदा-शिपेतूवाडी येथील खाडीपात्रात एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह तेथील ग्रामस्थांच्या नजरेत पडला. तात्काळ
याची माहिती ग्रामस्थांनी पोलीस पाटील समीर केरकर यांना दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी सावंतवाडीचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता
गायकवाड, पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्यासह पोलीस बाबुराव जाधव, प्रदीप नाईक, महिला पोलीस श्रीम. कदम
यांनी खातरजमा केली. मात्र, महिलेची ओळख पटली नव्हती. वेत्ये येथील ग्रामस्थांना खाडीपात्रात महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच तेथे जाऊन खातरजमा केली.
त्यावेळी सदर मृतदेह हा बेपत्ता प्रेमलता गावडे हिचा असल्याचे पोलिसांना सांगितले. या बाबत पोलीस पाटील केरकर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्युची नोंद केली. पोलिसांना मयत वृद्धेच्या नातेवाईकांनी दिलेल्या जबाबात मयत प्रेमलता गावडे हिच्या
पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर प्रेमलता गावडे ही दोन वर्षांपासून आजारी होती. सततच्या आजाराचे कारण शोधण्यासाठी भटजींकडे जाते, असे आपल्या घरात सांगितले होते