सावंतवाडी, दि.२५ फेब्रुवारी
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वसई कोकणरंग प्रतिष्ठान याच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी 27 फेब्रुवारी 2024 रोजी “जागर मराठीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सावंतवाडी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय ,मातृभाषेचे संवर्धन काळाची गरज, असा आहे. यावेळी प्रथम पारितोषिक 1000 द्वितीय पारितोषिक 800/रुपये ,तृतीय पारितोषिक 500/सन्मान पत्र देण्यात येणार आहे. हि स्पर्धा इयत्ता 5 वी ते 9 वी या वयोगटात होणार आहे. तरी स्पर्धकांनी आपली नावे सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार
9403073444 व खजिनदार रामचंद्र कुडाळकर 9763230814 यांच्याकडे 26 फेब्रू 2024, सायं ६ वाजेपर्यंत नोदवावी असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व कोकणरंग प्रतिष्ठान वसई याच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी मराठीभाषा यावरील तज्ञ शिक्षक उपस्थित राहून मार्गदर्शन करणारं आहेतःअशी माहिती अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी दिली.तरी जागर मराठीचा या कार्यक्रमात विदयार्थी यांनी सहभाग घ्यावा.असे आवाहन पत्रकार संघाचे सचिव मयूर चराठकर व खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे
Home आपलं सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व कोकणरंग प्रतिष्ठान वसई याच्या संयुक्त विद्यमाने मराठी...