साडेपाच लाख रुपयांची पाईप चोरीस गेले, मात्र तपास काम शून्य -माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

सावंतवाडी, दि.२५ फेब्रुवारी
सावंतवाडी नगर परिषदेच्या पाळणे कोंड धरण येथील पाईपलाईनचे काम सुरू आहे येथील सुमारे साडेपाच लाख रुपयांची पाईप चोरीस गेले, मात्र तपास काम शून्य आहे असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी म्हटले आहे.
सुमारे दोन महिन्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने सावंतवाडी पोलीस स्टेशन वरती सुमारे ३४ पाईप २०० किलो वजनाचा आहे याची किंमत सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या घरात जाते याबाबत एफ आय आर दाखल केली होती. मात्र पोलीस तपास योग्य दिशेने होत नाही सावंतवाडी चे पोलीस निरीक्षक यांनी तपास कामाला गती द्यावी लक्ष देऊन चोरांपर्यंत पोहचावे असे आवाहन बबन साळगावकर यांनी केले आहे.