वैभववाडी न.पं. ने शहरात बसविले सीसीटीव्ही : स्वतंत्र यंत्रणा उभारणारी ही जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सीसीटीव्ही केंद्राचे उद्घाटन

तसेच शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ

वैभववाडी, दि.२५ फेब्रुवारी

आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून वैभववाडी शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. न.पं. मार्फत सीसीटीव्ही केंद्र उभारणारी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत ही जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत ठरली आहे. या सीसीटीव्ही केंद्राचा शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. विशेष नागरी सेवा व सुविधा पुरविणे या योजनेतून आमदार नितेश राणे यांनी हा निधी उपलब्ध करून दिला आहे. वैभववाडी शहरात 12 ठिकाणी जवळपास 27 कॅमेरे बसविण्यात आले आहे. संपूर्ण शहर या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. या सीसीटीव्हीचा कंट्रोलरूम नगरपंचायत या ठिकाणी आहे. या कामाचा शुभारंभ नगरपंचायत येथे पार पडला. तसेच शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, नगराध्यक्ष नेहा माईणकर, राजेंद्र राणे, प्राचीन तावडे, बंड्या मांजरेकर, बबलू रावराणे, रोहन रावराणे, रोहित रावराणे, रत्नाकर कदम, सुनील भोगले, प्रशांत ढवण, उदय पांचाळ, प्रकाश पाटील, देवानंद पालांडे, संगीता चव्हाण, सुंदरी निकम, यामिनी वळवी, प्रकाश सावंत व नगरसेवक, नगरसेविका, भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.