कासव मित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम
आचरा,दि.२५ फेब्रुवारी(अर्जुन बापर्डेकर)
आज आचरा समुद्रकिनाऱ्यावरती सकाळी नऊ वाजता कासव मित्र( बाबू)सूर्यकांत धुरी यांच्या संगोपनातून
ऑलिव्ह रीड ले या प्रजातीच्या कासवाची 99 पिल्ले जन्मास आली त्यांना कासवमित्र बाबू उर्फ सूर्यकांत धुरी, श्री रिसॉर्ट चे मालक ग्रामपंचायत सदस्या सौ पूर्वा तारी,परेश तारी कस्टम अधिकारी श्रीमती नायर तसेच प्रदीप वाडेकर अक्षय वाडेकर यांसह अन्य निसर्गप्रेमी आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.कासव मित्र सुर्यकांत धुरी यांच्या या उपक्रमाचेकौतुक होत आहे.