कु.हर्ष जांभळे याने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते प्रशस्तीपञ व चषक देऊन गौरव

0

वैभववाडी,दि.१३ जानेवारी
   जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग माध्यमिक यांच्यावतीने आयोजित ५१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विदयालय मांगवली या विदयालयाचा विदयार्थी कु.हर्ष विनोद जांभळे ( इयत्ता दहावी) याने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते प्रशस्तीपञ व चषक देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
   त्याला विज्ञान शिक्षिका सौ.भोसले व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल कोकण विदया प्रसारक मंडळ, स्कूल कमिटी, मुख्याध्यापक शिवाजी पाटील, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी, पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.