महानाट्याचा आस्वाद घ्यावा देवगड तालुका भाजपाने केले आवाहन
देवगड,दि.२५ फेब्रुवारी
आमदार नितेश राणे यांच्या सौजन्याने देवगड तालुक्यातील जनतेला अयोध्या हे महानाट्य मोफत दाखवले जाणार आहे. हे महानाट्य एक मार्च रोजी सादर केले जाणार आहे.
हे महानाट्य सिंधुसंकल्प अकादमी व सागर एन्टरटेन्मेंट यांनी केले असून त्याचे लेखन व दिग्दर्शन केदार देसाई यांनी केले आहे तर निर्मिती प्रणय तेली यांची आहे.
पाटणकर ग्राउंड, खरेदी विक्रि संघ पेट्रोलपंपा समोर, देवगड येथे हे महानाट्य होणार असून शुक्रवार दि.१ मार्च २०२४ रोजी, वेळ: सायं. ७:०० अशी ठेवण्यात आली आहे.
पहिल्या काही रांगा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत जरी हे महानाट्य मोफत असले तरी त्यासाठी प्रवेशिका घेणे आवश्यक असून प्रवेशिका देवगड सातपायरी येथील आमदार संपर्क कार्यालय, जमसांडे वडांबा येथील भाजपा कार्यालय, तसेच पडेल येथील भाजपा संपर्क कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.
या प्रवेशिका सर्वांनी घ्यावा व महानाट्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन देवगड तालुका भाजपाने केले आहे