कोकणातील निसर्ग सौंदर्यावर रिल्स व मिम्स तयार केल्या पाहिजेत – आ.नितेश राणे

रिल्स व मिम्स कोकण सन्मान स्पर्धा २०२४ सोहळा

कणकवली दि.२५ फेब्रुवारी(भगवान लोके)

कोकणात निसर्ग सौंदर्य खूप सुंदर आहे. हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जगातील पर्यटक कोकणात यावेत याकरिता युटूबर्स, एनफ्लूएन्सर्स व सोशल मीडियावर फेमस असलेल्या रिल्स व मिम्स स्टार्सनी कोकणातील निसर्ग सौंदर्यावर रिल्स तयार केल्या पाहिजेत,असे आवाहन भाजपा आ.नितेश राणे यांनी केले .

कोकणातील निसर्ग सौंदर्य रिल्स व मिम्स च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, आ.नितेश राणे यांच्या संकल्पनेतून रिल्स व मिम्स कोकण सन्मान स्पर्धा २०२४ सोहळा हॉटेल नीलम कंट्रीसाईड कणकवली येथे संपन्न झाला.यावेळी सौ. ऋतुजा नितेश राणे, चिरंजीव निमिष नितेश राणे,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,युटूबर्स व एन्फ्ल्यूएंसर्स अंकिता प्रभू वालावलकर, शंतनू रांगणेकर, श्रुतिका कोळंबेकर, मंगेश काकड, सोहम शहाणे, कुहू परांजपे, प्रशांत नाक्ती, वृषाली जावळे, प्रसाद विधाते, गणेश चनारे, गौरी पवार, बंटी कांबळी, सिद्धांत जोशी आदी उपस्थित होते.

त्या रिल्स जगभरातील पर्यटकांपर्यंत पोचल्या पाहिजे. कोकणातील सर्वांगसुंदर असलेले निसर्ग सौंदर्य आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी कोकणातील क्रियेटर्स रिल्स व मिम्स च्या माध्यमातून यशस्वी ठरतील असा विश्वास या वेळी बोलताना व्यक्त केला.

कोकणातील युट्यूब व सोशल मीडियावर रिल्स व मिम्स बनविणाऱ्या creators ना एकत्र आण्यासाठी मिस्म व रिल कोकण सन्मान स्पर्धा आयोजित केली. या कलाकार व इंस्टाग्राम creators ना व्यासपीठ मिळावे हा हेतू स्पर्धा घेण्यामागील आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षदीपला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी लक्षदीपच्या समुद्र किनारी फोटो काढले होते. त्यानंतर लक्षदीपला भेट देण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढला आहे. मालदीव व लक्षदीप प्रमाणेच कोकणातील किनारपट्टी व निसर्ग सौदर्य अप्रतिम आहे. कोकणातील समुद्र किनारे व निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जगातील पर्यटक याठिकाणी यावेत यासाठी कोकणातील समुद्र किनारे व निसर्ग सौंदर्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवणे नितांत गरजेचे आहे. याकरिता युटूबर्स, एन्फ्ल्यूएंसर्स व सोशल मीडियावर फेमस असलेल्या कलाकारांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली.

कोकणातल्या क्रियेटर्सना प्रोत्साहन देणं आणि त्या निमित्ताने कोकण पर्यटन घराघरात पोहचावं हाच आमदार नितेश राणे यांचा हेतू आहे. या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण आयोजित केलेली रील आणि मिम स्पर्धा. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळून शेकडो रील्स आणि मिम्स स्पर्धकांनी पाठवल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या. विजेत्या स्पर्धकांचा कोकण सन्मान देवून आ.नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.