अनोखी दुनियादारी ! बांदा येथील युवकांनी श्रमदानाने केली सार्वजनिक पाण्याच्या टाकीची साफसफाई

बांदा दि.२६ फेब्रुवारी 
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत बांदा गवळीटेंबवाडी व निमजगावाडी येथील युवकांनी एकत्र येत निमजगा येथे असलेल्या बांदा नळपाणी योजनेच्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीची आज साफसफाई केली. तसेच टिसीएल पावडर व इतर जंतुनाशक टाकुन टाकी स्वच्छ करण्यात आली.

यावेळी बोलताना श्री गुरु कल्याणकर यांनी सांगितले की, पाण्याच्या साठवणीकरीता बंधारा, तसेच टाकीचे व वितरणाचे नियोजन याकरिता माजी सभापती श्री शितल राऊळ यांनी आम्हाला प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन केले.यामुळे दरवर्षी होणारे पाण्याचे दुर्भिक्ष यापुढे होणार नाही अशी आशा व्यक्त केली.
यावेळी श्री गुरु कल्याणकर,हेमंत दाभोलकर,सर्वेश नाईक,शैलेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर,विराज उर्फ बबलू देसाई,ग्रामपंचायत पाणी कर्मचारी अजय आईर,पप्या वझरकर,ओंकार सावंत यांनी सहभाग घेतला.
या आदर्शवत कार्याची दखल बांदा सरपंच श्रीमती प्रियांका नाईक यांनी घेतली व त्यांचे कौतुक करत अशा पद्धतीचे विचार प्रत्येक सुजाण नागरिकांनी एकत्र येत केले तर समाजात खूप मोठा बदल घडू शकतो असे यावेळी सांगितले.बांदा शहरातून सर्व स्तरातून या कामाचे कौतुक होत आहे.