४ हजार बुथ कार्यकर्ते उपस्थित राहतील-भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
सावंतवाडी दि.२६ फेब्रुवारी
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले नसले तरी भाजपा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे प्रबोधन करत आहे .याच पार्श्वभूमीवर बुधवार दि.२८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा बुथस्तरीय कार्यकर्ता महासंमेलन आरपीडी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले असून यावेळी सुमारे ४ हजार बुथ कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला .
येथील भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रभाकर सावंत यांनी ही माहिती दिली. यावेळी सावंतवाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख माजी आमदार राजन तेली, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, राजेंद्र राऊळ, व अमित परब आदी उपस्थित होते
यावेळी प्रभाकर सावंत म्हणाले, दिल्ली येथे देशभरातील ११ हजार प्रतिनिधींची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये झाली. या बैठकी दरम्यान निवडणुकीचे बिगुल वाजल्याचे संकेत मिळाले आहेत .त्यामुळे गेल्या दहा वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची यशस्वी कारकीर्द या मेळाव्याचे प्रमुख प्रबोधन करणारी ठरली आहे.
मावळ, रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन लोकसभा मतदार संघाचा एक क्लस्टर करण्यात आला असून या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.२७ व २८ फेब्रुवारी रोजी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. बुथ स्तरीय कार्यकर्ता संमेलन, प्रभुत्व लोकांचे संमेलन, ऐतिहासिक शहरांच्या भेटी, मोर्चा आघाडीचे कार्यकर्त्यांचे मिळावे घेण्याचे ठरविण्यात आले आहेत .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात वेगवेगळे कार्यक्रम नियोजित आहेत असे प्रभाकर सावंत म्हणाले
या बुथस्थरीय क्लस्टरचा पनवेल येथून प्रवास सुरू होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुथ स्तरीय कार्यकर्ता महासंमेलन बुधवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी येथील आरपीडी हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ४ हजार बूथ स्तरीय कार्यकर्ते उपस्थित राहतील .जिल्हाभर ९१८ बूथ आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन बुथ स्तरीय कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. एक अधिक दहा कार्यकर्ता कार्यकारणी, पन्ना प्रमुख, जबाबदारी सुपर वॉरियर ३३० आहेत शक्ती केंद्र प्रमुख २१७ आहेत. संघटनात्मक रचना भाजपाने गेल्या दोन वर्षापासून सुरू केली आहे. संघटनात्मक स्वरूपात भाजपाचे सात मोर्चा आहेत महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा, ओबीसी मोर्चा ,अनुसूचित जाती मोर्चा ,अनुसूचित जमाती मोर्चा हेही या संमेलनात उपस्थिती दर्शवतील असे सांगून २५ सेल व जिल्हा व तालुका संयोजक यामध्ये सहभागी होतील असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजन तेली यांच्यावर आहे. या बुथस्थरीय कार्यकर्ता महासंमेलनामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत ,केंद्रीय मंत्री नारायण राणे ,पालकमंत्री रवींद्र चव्हाण ,क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, अतुल काळशेकर ,सरचिटणीस विक्रांत पाटील, निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजन तेली, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे हे उपस्थित राहतील. बुथ कार्यकर्ता महासंमेलन यशस्वी होण्यासाठी महेश सारंग, संजू परब,बाळू देसाई ,मनोज नाईक व मान्यवरांनी नियोजन केले आहे असे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा कमळ निशाणी वरच लढवला जाईल. उमेदवार कोण असेल हे वरिष्ठ ठरवणार आहेत, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले ते म्हणाले,खासदार विनायक राऊत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात बोलत आहेत ते भीतीपोटी,कारण त्यांची आता लोकसभा मतदारसंघात ताकद उरलेली नाही मतदारसंघात दोनच विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचे आमदार आहेत तरीही महायुतीची ताकद आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रभाकर सावंत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, माधव भंडारी यांनी अख्खे आयुष्य भाजपासाठी समर्पित केले. त्यांना राज्यसभेची उमेदवारीची संधी मिळाली नाही त्यामुळे त्यांच्या मुलाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया साहजिकच आहे. मात्र भाजप माधव भंडारी यांच्या कार्याचा गौरव करेल.
यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण करण्यात आले.