सावंतवाडीची पूजा सावंत ठरली ‘मिस वेंगुर्ला २०२४‘

वेंगुर्ला, दि.२६ फेब्रुवारी

वेंगुर्ला येथे सुरू असलेल्या ‘गरूडझेप महोत्सवातील‘ विविध स्पर्धांमुळे हा महोत्सव अधिकाधिकच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. यावर्षी मंडळातर्फे प्रथमच आयोजित केलेल्या व रविवारी संपन्न झालेल्या ‘मिस वेंगुर्ला २०२४‘ या स्पर्धेत पूजा सावंत (सावंतवाडी) ही ‘मिस वेंगुर्ला‘ची मानकरी ठरली. तिला मंडळातर्फे रोख ७ हजार रूपये व आकर्षक चषक तसेच स्वप्निल पालकर पुरस्कृत आंबापेटी देऊन गौरविण्यात आले.

राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाच्या ‘गरूडझेप महोत्सव २०२४‘ला २४ फेब्रुवारीपासून प्रारंभ झालेल्या ‘गरूडझेप महोत्सव‘ अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न होत आहे. २५ फेब्रुवारी रोजी ‘मिस वेंगुर्ला २०२४‘ ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन उबाठाचे सावंतवाडी विधानसभा संफ प्रमुख शैलेश परब यांच्या पत्नी तथा मुंबईच्या माजी नगरसेविका शिवानी परब यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेविका सुमन निकम, महिला तालुका संघटीका सुकन्या नरसुले, महिला शहर अध्यक्ष मंजूषा आरोलकर, शाखा संघटीका अरूणा माडये, शेजल भाटकर, विधी राऊळ, रेखा नाईक, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर आदी उपस्थित होते.

स्पर्धेत सुमारे सिधुदुर्ग जिल्ह्यातील १० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविताना तन्वी गोसावी ही रोख ५ हाजार व आकर्षक चषकाची तर नंदिनी बिले हिने तृतीय क्रमांक पटकावित रोख ३ हजार व आकर्षक चषकाची मानकरी ठरली. बेस्ट स्माईल-उर्वी आंदुर्लेकर, बेस्ट हेअरस्टाईल हर्षदा बागायतकर, बेस्ट लूक-कॅटवॉक शर्वरी नाबर यांना प्रत्येक रोख १ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण प्रविण पराडकर, प्रविण मांजरेकर व पुनम बोवलेकर यांनी केले. स्पर्धेचे निवेदन शुभम धुरी याने केले.

बक्षिस वितरण प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, संगीता नाईक, कुंदा राऊळ, प्रांजल वेंगुर्लेकर, हिताली वेंगुर्लेकर, जानवी खानोलकर, शिवानी राऊळ यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष साबाजी राऊळ, सचिव सिद्धेश रेडकर, खजिनदार स्वप्निल पालकर, सदस्य विवेक राऊळ, मंगेश परब, अजित राऊळ, अद्वैत आंदुर्लेकर, बापू वेंगुर्लेकर, कौशल मुळीक, ज्ञानेश्वर रेडकर, निखिल नाईक, अनंत रेडकर, विजय आंदुर्लेकर, अनिकेत वेंगुर्लेकर, गौरव राऊळ, तुषार भाटकर, हितेश सावंत, दिनेश पाटील, हर्षद रेडकर, पंकज शिरसाट, लोकेश शिरसाट, आर्यन शिरसाट, सागर शिरसाट, रतिक वेंगुर्लेकर, ऋषिकेश रेडकर आदी उपस्थित होते.