सावंतवाडी दि.२६ फेब्रुवारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी आय मानांकित काजूबीच्या वाढीव दरासंदर्भात शासनाला आंदोलनाच्या मार्गातून जाग आणल्यानंतर, शासनाच्या अर्थसंकल्पातून जर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही तर पुढे काय करायचे या संदर्भात चर्चा विनिमय व ठोस निर्णय घेण्यासाठी उद्या मंगळवार दि.२७ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांची महत्त्वाची मीटिंग आयोजित केली आहे.
मागच्या आठवडाभरातील झालेल्या शेतकऱ्यांच्या जागृतीतून येत्या निवडणुकीत एक सर्वसामान्य शेतकरी उमेदवार उभा करून आपल्या मतांची ताकद दाखवून द्यावी किंवा मतदानावर बहिष्कार घालावा असा सूर निघाला आहे यावर देखील या मीटिंगमध्ये चर्चा होईल . या मीटिंग नंतर पुढील दिशा ठरविली जाणार आहे. कृपया सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी, असे सावंतवाडी दोडामार्ग तालुका बागायतदार संघाचे अध्यक्ष श्री विलास सावंत यांनी म्हटले आहे.