२८ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जाणार

सावंतवाडी दि.२६ फेब्रुवारी
माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालय माजगाव व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ माजगाव येथे बुधवार दि.२८ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे.

यावेळी ग्रंथालय मार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच मराठी भाषा दिन विषयी मार्गदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच डॉ अर्चना सावंत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे माजी तालुकाध्यक्ष, इतिहासकार प्रा. डॉ जी ए बुवा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अँड संतोष सावंत, उपसरपंच संतोष वजरे, मुख्याध्यापक एस बी सावंत, आर के सावंत, बी एस चौरे, पोलीस अधिकारी लोकेश कानसे, श्री गुंजाळ ,सिद्धेश कानसे, मिलिंद कासार आदी उपस्थित राहणार आहेत
तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन माजगाव ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले आहे.