रूग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षकांनी घेतली गंभीर दखल,देवगड ग्रामीण रूग्णालयातील घटनेने खळबळ
देवगड,दि.२६ फेब्रुवारी
स्वच्छतेच्या नावाखाली प्रसुतीसाठी दाखल झालेल्या मातेकडून पैसे घेतले गेल्याचे तक्रार वैद्यकीय अधिक्षकांकडे प्राप्त झाली.
देवगड ग्रामीण रूग्णालयातील कंत्राटी महिला कर्मचा-याचा प्रताप!
मनसेने उघडकीस आणल्याने
रूग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षकांनी गंभीर दखल घेऊन
पैसे घेणा-या महीला सफाई कर्मचा-याला कामावरून
कामावरून बडतर्फ केल्याचे आदेश दिले आहेत.
देवगड ग्रामीण रूग्णालयातील घटनेने खळबळ उडाली आहे.
प्रसुतीसाठी रूग्णालयात आलेल्या मातेकडूनच स्वच्छतेचा नावाखाली पैसे उकळणाèया महिला सफाई कर्मचा-यांना मनसेच्या आक्रमक भुमिकेमुळे दणका बसला असून ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय वीटकर यांनी संबंधीत महीला कंत्राटी कर्मचा-याला तात्काळ सेवेतून बडतर्फ केले आहे.देवगड रूग्णालयातील या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.