कामकाज बंद करण्याचा दिला इशारा
दोडामार्ग, दि. २६ फेब्रुवारी
दोडामार्ग तालुक्यातील तीन जिल्हा परिषद आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र जोडण्यात आलेल्या दोडामार्ग तालुका रुग्णालयात गेल्या वर्षापासून स्ञी रोग तंंज्ञ डॉक्टर नसल्याने गरोदर महिलांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. महिला रुग्णाला प्रसुती करिता गोवा येथे पाठवले जात आहे यामुळे नातेवाईक यांची फरफट होऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय इतर आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. वारंवार मागणी करुन देखील सरकार लक्ष देत नाही त्यामुळे संतापलेल्या शिवसेना उध्दव ठाकरे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे. याची दखल घेऊन तातडीने डॉक्टर न दिल्यास रूग्णालयातील कामकाज बंद पाडले जाईल असा इशारा दिला आहे.