मालवण,दि. २६ फेब्रुवारी
देव, देश आणि धर्मासाठी वीर सावरकरांचे जीवन व्यापून गेले होते. सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. सावरकरांच्या जीवनामध्ये थोर क्रांतिकारक, राजकारणी, कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक, वकील असे एक ना अनेक पैलू आपणास पहावयास मिळतात, सावरकरांचे समग्र जीवन एक धगधगते अग्निकुंडच होते, असे प्रतिपादन असे विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड प्रमुख भाऊ सामंत म्हणाले.
मालवण भरड येथे वीर सावरकरांची पुण्यतिथी निमित्त सावरकरांच्या पुतळ्यास भाऊ सामंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संदीप बोडवे, प्रशांत हिंदळेकर, अमित खोत, महेश कदम, कृष्णा ढोलम, भूषण मेतर, ओंकार यादव, पपू पोखरणकर, भिवा शिरोडकर, नंदू वस्त, चेतन मुणगेकर, सुनील लुडबे, सुनील बागवे, यांसह अन्य उपस्थित होते. यावेळी संदीप बोडवे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना वीर सावरकरांच्या विचारांची ज्योत अशीच अखंडितपणे तेवत ठेवूया, असे आवाहन केले.