२६ जानेवारी रोजी कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार -अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर

0

सावंतवाडी दि.१३ जानेवारी

कोकण रेल्वेच्या सावंतवाडी स्थानकावर टर्मिनस चे काम जलद गतीने व्हावे आणि प्रा. मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून टर्मिनसला प्रा. मधु दंडवत यांचे नाव द्यावे. रेल्वे गाड्या थांबा मिळावा म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर यांनी दिली.लेखी आश्वासना शिवाय आंदोलन स्थगित केले जाणार नाही असा त्यांनी इशारा दिला.

सावंतवाडी टर्मिनस आणि सावंतवाडी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल भूमिपूजन होऊनही कामे पूर्णत्वास गेली नाही. ती रेंगळलेली आहेत असे दोन महत्त्वाचे प्रश्न असल्याचेही अँड संदीप निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, रमेश बोंद्रे,संघटनेचे सचिव मिहीर मठकर ,पुंडलिक दळवी, भूषण बांदिवडेकर, विलास जाधव,उमाकांत वारंग, अँड सायली दुभाषी, उमेश कोरगावकर, सिध्देश सावंत तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अँड संदीप निंबाळकर म्हणाले, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन होऊन आठ वर्ष उलटली आहेत पहिल्या टप्प्याचे काम झाले दुसऱ्या टप्प्याचा निधी परत गेला ते काम पूर्णतः जावे अशी मागणी आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधु दंडवते यांचे जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्त साधून टर्मिनल प्रा. मधु दंडवते यांचे नाव द्यावे मंत्री दीपक केसरकर यांनी नाव देण्याचे रेल्वेमध्ये धोरण नसल्याचे सांगितले मात्र छत्रपती शिवाजी टर्मिनस ,लोकमान्य टिळक टर्मिनस अशी नावे दिलेली आहेत मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये प्रा.मधु दंडवते यांचे नाव देण्याबाबत ठराव घ्यावा आणि तो कोकण रेल्वे कार्पोरेशन आणि भारतीय रेल्वेला पाठवावा असे आवाहनही अँड निंबाळकर यांनी केले.

मंत्री केसरकर यांनी रेल्वे गाड्या थांबा मिळणार असल्याचे जाहीर केले मात्र अजूनही कोणत्याही गाडी ला थांबा मिळालेला नाही. जिल्ह्यातून १५ रेल्वे धूळ उडवत जातात त्यांना जिल्ह्यातील ठिकठिकाणी स्थानकावर थांबा मिळावा. सोबतच सावंतवाडी स्थानकावरील थांबाव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेची आहे.असे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी टर्मिनस झाले तर सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या परिसराचा विकास होईल. सावंतवाडी शहराच्या बाहेरून मुंबई गोवा महामार्ग गेला त्यामुळे सावंतवाडी शहरावर आर्थिक उलाढालीचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून टर्मिनस ची मागणी पुढे आली होती त्यात माजी आमदार जयानंद मटकर, दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला होता. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू झाल्यानंतर टर्मिनसचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाले मात्र ते भूमिपूजन होऊन पुढे पूर्णत्वास गेलेले नाही ते पूर्णतः जावे . जयानंद मठकर यांना केसरकर गुरूस्थानी असल्याचे सांगतात तर मठकर यांना प्रा मधू दंडवते गुरूस्थानी होते त्यामुळे दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे अशी मागणी आहे असे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर टर्मिनस आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल भूमिपूजन होऊनही प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. दीपक केसरकर यांनी आश्वासन देण्यापलीकडे प्रत्यक्षात कृती करावी असे त्यांनी आवाहन केले. खासदार विनायक राऊत आणि मान्यवरांकडे ही मागणी करण्यात आलेली आहे असे निंबाळकर म्हणाले. उद्या रविवारी खासदार विनायक राऊत येणार आहेत त्यांना आम्ही भेटणार आहोत असेही त्यांनी सांगितले
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रा .मधु दंडवत यांचे नाव द्यावे.गाड्यांना थांबा मिळावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे हे भव्य आंदोलन होईल असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी सचिव मिहीर मठकर यांनी दि.२६ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे हे आंदोलन कोणाच्याही विरोधात नाही तर प्रवासी संघटनेच्या मागण्यांसह कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या विरोधात आहे आम्ही गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा करत आहोत आंदोलन यशस्वी होण्यासाठी नियोजनही केले आहे. कोकणातील मुंबई सह २५ संघटना या आंदोलनात सहभागी होणार असून ते आपल्या खर्चाने विविध भागातून या आंदोलनांमध्ये सहभाग दर्शवणार आहेत हेच या आंदोलनाचे यश असल्याचे मिहीर मठकर यांनी बोलताना सांगितले.