भारत देशाच्या प्रगतीत व विकासात कृषी क्षेत्राचे योगदान मोठे-किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश उर्फ तात्यासाहेब भेगडे

 भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्रातील पहिल्या कार्यालयाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते

देवगड,दि.२६ फेब्रुवारी
भारत देशाच्या प्रगतीत व विकासात कृषी क्षेत्राचे योगदान मोठे असून कृषी प्रधान देशाच्या विकासाकरता भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत व या योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत यापूर्वीच पोहोचला असून त्यांना विविध योजनांची माहिती देणे व मिळालेला लाभ त्यांच्या पर्यंत पोहचत असताना त्यांच्या सूचना समस्या समजावून घेऊन त्या सोडविण्याची जबाबदारी भाजप किसान मोर्चाची आहे.त्याचप्रमाणे मिळालेले लाभ हे ग्राम परिक्रमा यात्रा या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत गावच्या शेवटच्या घटना पर्यंत पोहोचविणे व शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सुखी समृद्धी करून देशाची आणि शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्था सुधारण्याकरता विशेष मार्गदर्शन करणे हे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या माध्यमातून ग्राम परिक्रमा यात्रा संपूर्ण भारतभर सुरू आहे. आणि याचाच एक भाग म्हणून या ग्रामपरिकमेची सुरुवात देवगड तालुक्यातून होत असताना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पहिले कार्यालय हे देवगड तालुक्यातील कट्टा या ग्रामीण भागात निर्माण होत आहे ही बाब अतिशय अभिमानाची व कौतुकास्पद आहे. भाजप किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना स्वावलंबी बनविण्याकरिता त्याचबरोबर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यात शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे.त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा आर्थिक विकास होण्याकरता सर्व कार्यकर्त्यांनी त्या गावातील शेतकऱ्यापर्यंत पोहचावे असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश उर्फ तात्यासाहेब भेगडे यांनी जामसंडे कट्टा या ठिकाणी भाजप किसान मोर्चा कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्रातील पहिल्या कार्यालयाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले या सोहळ्यास प्रदेश सरचिटणीस राजन चिके,उपाध्यक्ष डॉ भाई बांदकर,प्रभारी उदय प्रभुदेसाई संपर्क प्रमुख दादा सामंत, कृषी अधिकारी कैलास ढेपे,राजेश माळवदे, प्रीती देवधर,ज्योती देसाई,भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर,महिला तालुका अध्यक्ष उष् कला केळुसकर,कट्टा सरपंच श्वेता कोयंडे, भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,गुरुदेव परुळेकर ,चारुदत्त सोमण,व अन्य उपस्थित होते.
दिपप्रजवलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या सोहळ्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मान्यवरांचे स्वागत शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर,कृष्णा बांदकर,राजन चिके, डॉ.भाई बांदकर,यांनी उपस्थित शेतकरी ग्रामस्थ याना मार्गदर्शन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतीविषयक विविध योजनाचा प्रचार प्रसार आपल्या मार्गदर्शनातून केला व शेतकऱ्यांपर्यंत या विविध योजना व त्यांचा लाभ मिळण्याकरिता मार्गदर्शन केले.
गोवा प्रदेश महामंत्री उदय प्रभुदेसाई यांनी आपल्या मार्गदर्शनात
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्यातील पहिले कार्यालय देवगड तालुक्यातील कट्टा या गावी होत असून शेतकऱ्यांचे हित जोपासणारे कर्तृत्वान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी जगात मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे .आणि या पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांचा पोहोचत आहे शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचत असताना लाभ न मिळालेले नेहमी विरोध करण्याचे काम करत असतात परंतु नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विविध योजनांची माहिती हे कार्य देवगड पुरते मर्यादित न रहाता म तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान मोर्चाचे आहे हे कार्य देवगड भर मर्यादित नसून संपूर्ण भारतभर सुरू आहे या माध्यमातून एपीसी प्रशिक्षण समुद्र शेती अभियान ,गोपालन आणि संगोपन ,शेतकरी सर्व शिक्षा अभियान, आंबा उत्पादन व मार्केटिंग याविषयी देखील माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ग्राम परिक्रमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेणे हे काम किसान मोर्चाची जबाबदारी असून एक ग्राम परिक्रमा यात्रा यशस्वी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. माजी आमदार अजित गोगटे यांनी आपल्या मार्गदर्शनात आंब्यावर आधारित पूरक उद्योग या भागात सुरू आहे. त्याचबरोबर सेंद्रिय खतांचा कारखाना उभारणेही गरजेचे असून स्कॅनिंग मशीनच्या माध्यमातून शंभर टक्के गॅरंटीचा आंबा ग्राहकांना देणे अशा प्रकारचे उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत आंबा पिकाबाबत वारंवार विविध व तक्रारी येत असताना त्यावेळी वेगवेगळे प्रयोग करणे हे आवश्यक असून कोकणातील शेतकरी अन्य विविध पिके देखील घेत असतो परंतु नुकसान भरपाई बाबत अन्य भागाच्या तुलनेत कोकणाला योग्य न्याय मिळत नाही,असे सांगून आत्महत्या मुक्त कोकण भाग असल्याने येथील शेतकरी बागायतदारासाठी विशेष निकष हे शासनाने लावणे महत्त्वाचे आहे. असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. कृषी अधिकारी कैलास ढेपे यांनी शेतकऱ्यांच्या, शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेले या व्यासपीठाचा लाभ निश्चितपणे गावागावातून शेतकऱ्यांच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरेल व त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून किसान मोर्चा समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. बँकिंग विषयी चारुदत्त सोमण यांनी महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा च्या महाराष्ट्रातल्या पहिला कार्यक्रमस उपस्थित असलेले कट्टा गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजूबाजूच्या गावातील सरपंच व अन्य मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जुवाटकर यांनी करून प्रस्तावना प्रास्ताविक गणेश सागवेकर यांनी केले. आभार डॉ. गुरुदेव परुळेकर यांनी मानले सोहळ्याचे निमित्ताने निमित्ताने संतोष जुवाटकर देवगड मंडळ अध्यक्ष, मंडळ उपाध्यक्ष कृष्णा बांदकर सदस्य विनायक बांदकर अमोल कोयंडे, सागर बांदकर यांची नियुक्ती करण्यात आली व नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.