सावंतवाडी,दि. २६ फेब्रुवारी
सिमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात वास्तव्य करुन राहणाऱ्या १० बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेत सिंधुदुर्ग पोलीसांनी केली कारवाई केली.त्या १० बांगलादेशी ना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
या प्रकरणी अँड स्वप्नील कोलगावकर यांनी जामीन साठी अर्ज दाखल केला आहे.
बांदा व सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी त्यांच्या हद्दीमध्ये अवैधरित्या बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असलेबाबत माहिती मिळाली. सदर माहितीचे अनुषंगाने अधिक शोध-चौकशी करता बांदा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात बळवंतनगर, बांदा येथे एका पत्र्याचे शेडमध्ये बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार प्रभारी अधिकारी, बांदा पोलीस ठाणे यांनी त्यांचे स्टाफसह जावून तेथे वास्तव्यास असलेल्या ६ नागरीकांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता ते सर्व नागरीक बांगलादेशी असल्याचे उघडकीस आले.
तसेच प्रभारी अधिकारी, सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी मिळालेल्या माहितीचे अनुषंगाने सावंतवाडी पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात आरोंदा, देऊळवाडी येथे सातेरी भद्रकाली मंदिराचे पाठीमागे एका पत्र्याचे शेडमध्ये बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार प्रभारी अधिकारी, सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी त्यांचे स्टाफसह जावून तेथे वास्तव्यास असलेल्या ४ नागरीकांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता ते सर्व नागरीक बांगलादेशी असल्याचे, तसेच ते भारत-बांगलादेश सिमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश करुन आरोंदा, देऊळवाडी येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले. सदर ४ बांगलादेशी नागरीक अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
बांदा पोलीस ठाणे ताब्यात घेतलेल्या ची नावे मोहम्मद शांत सरकार (२०), राजू मोहम्मद शाहिद मुल्ला (२६), मोहम्मद रबेल उर्फ असद उल्ला मोहम्मद फारुख खान (२६),मोहम्मद साई लदूत उर्फ मणिरूल फारुख खान (२६) मोहम्मद अन्वर अब्दुल हसीन सेकंड (६५) मुमताज बेगम मोहम्मद अन्वर अब्दुल हसीन सेकंड (४५) सर्व राहणार बांदा,बळवंत नगर ,मुळ बांगलादेश तसेच आरोंदा भद्रकाली मंदिर जवळपास पत्र्याची शेड मध्ये राहत असलेले सैफल अन्सार अली मोडंल (१९),
इनाजून युनूस बिस्वास (२०),सालेया बीबी युनुस बिस्वास (३९), आणि हुमायून बिस्वास (२०) राहणार बांगलादेश नागरिक यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते . आज सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली.