सावंतवाडी दि.२६ फेब्रुवारी
केसरी (ता.सावतवाडी) येथील जमीन विक्री प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्र आणि मालक असल्याचे भासवून २० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आला आहे. त्यातील एकाला चौकशीसाठी न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव म्हारकाटवाडी येथील ज्ञानेश्वर गवळी यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अक्षय आनंद सावंत रा. कुब्रंल ता दोडामार्ग,अरुण डॅनी मीरांडा आणि अन्य चार जण यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. यामध्ये अक्षय आनंद सावंत याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर करत चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.