कणकवली महाविद्यालयात मार्गदर्शन
कणकवली दि.२६ फेब्रुवारी(भगवान लोके)
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयत स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्याथ्यांची स्वतंत्र तुकडी तयार करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना विविध पदावरील राजपत्रित अधिकारी व तज्ज्ञ मान्यवरांचे चे मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे. या विशेष स्पर्धा परीक्षाच्या या विशेष मार्गदर्शन सत्राचे उदघाट्न कणकवलीचे तहसीलदार श्री. दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे उपस्थित होत्या.
यावेळी तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करावी याविषयी स्वतःचे अनुभव कथन केले. “महाविद्यालयीन काळापासून सामान्य ज्ञानाची पुस्तके व वर्तमान पत्रे वाचन्याची सवय ठेवली पाहिजे. शीघ्र यशाची अपेक्षा न ठेवता दिर्घकाल अभ्यास आणि सातत्यापूर्ण तयारी केली तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो व अधिकारी पदापर्यंत पोहचू शकतो. शासकीय अधिकारी झाल्यानंतर वैयक्तिक लाभाबरोबरच सामाजिक समाधान मिळते. स्पर्धा परीक्षाची तयारी करताना सकारात्मक प्रेरणा देणारे मित्र महत्त्वाचे ठरतात” असे सांगितले.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. राजश्री साळुंखे यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.” महाविद्यालयीन जीवनातच आपण स्वतःच्या क्षमता ओळखू शकतो. ध्येय निश्चित करून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते” असे प्रतिपादन डॉ राजश्री साळुंखे यांनी केले.
महाविद्यालायचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी सर्व प्रथम मान्यवारांचे स्वागत केले. “महाविद्यालयीन स्पर्धा परीक्षाचे हे वर्ग विद्यार्थ्यांच्या करिअरची योग्य दिशा ठरवतील. त्यासाठी विद्यार्थी वर्गाची सर्व प्रकारची तयारी करून घेतली जाणार आहे” असे स्पष्ट केले. यावेळी डॉ. राजेन्द्र मुंबरकर , डॉ.सोमनाथ कदम डॉ.बी.एल.राठोड, मंडळ अधिकारी श्री दिलीप पाटील, प्रा. नूतन घाडीगावकर, प्रा.दिपा तेंडोलकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सीमा हडकर यांनी व शेवटी आभार प्रा. एस.आर. जाधव यांनी मांडले.