सावंतवाडी दि.२६ फेब्रुवारी
आंबोली येथे साळीदंर या वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडीत असलेल्या सहा संशयित आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सर्शत जामीन मंजूर केला आहे .त्यांचा जातमुचलका घेऊन जामीनावर मुक्तता करण्यात आली.
या संशयीत ६ ही जणांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सर्शत जामीन जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी मंजूर केला. सोमवार व गुरूवारी वन विभाग कार्यालयात हजेरी लावावी तसेच आंबोली परिसरात अन्य दिवशी जाऊ नये अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. संशयीत आरोपीतर्फे अँड. परिमल नाईक, अँड. सुशील राजगे, अँड.रश्मी नाईक यांनी काम पहिले.
आंबोली वनजगंल परिसरात साळीदंर या वन्यप्राण्याची शिकार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी इनोव्हा कारसह सहा जणांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी फरान समीर राजगुरू (वय २६), नेल्सन इज्माईल फर्नाडिस (वय ४२) दोघे (रा. सालईवाडा-सावंतवाडी), बाबुराव बाळकृष्ण तेली (वय ४२, रा. सावंतवाडी), सर्फराज बाबर खान (वय ३४), रजा गुलजार खान (वय २३) दोघे (रा. बांदा गडगेवाडी), अरबाज नजीर मकानदार (वय २६, रा. माठेवाडा) आदींचा समावेश आहे. या सर्वांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम-1972 नुसार तसेच मनाई आदेश असताना हत्यारे घेऊन वनजमिनीत फिरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यांना यापूर्वी अटक करून न्यायालयात हजर केले असता प्रथम वनकोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती.
या प्रकरणी उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.एस नवकिशोर रेड्डी, विभागीय वन अधिकारी(दक्षता), कोल्हापूर श्री.दिलीप भुरके, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली, वनक्षेत्रपाल आंबोली सौ. विद्या घोडके, फिरतेपथक वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, वनपाल सौ. पूनम घाटगे, पोलीस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, पांडुरंग गाडेकर यांनी चौकशी केली.
Home आपलं सिंधुदुर्ग आंबोली येथे साळीदंर या वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी सहा संशयित आरोपींना जिल्हा सत्र...