खासदार विनायक राऊत १४ जानेवारी रोजी सावंतवाडी दौऱ्यावर

0

सावंतवाडी,दि.१३ जानेवारी
खासदार विनायक राऊत उद्या रविवार दि. १४ जानेवारी रोजी दुपारी सावंतवाडी दौऱ्यावर असून सावंतवाडी शहरात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी बैठक होणार आहे तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे आणि प्रा मधू दंडवते यांचे नाव द्यावे म्हणून आंदोलन छेडले जाणार आहे त्याबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत यांच्याशी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर व पदाधिकारी चर्चा करणार आहेत.