कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया
कणकवली दि.२६ फेब्रुवारी(भगवान लोके)
डॉ. मनोहर जोशी सर गेले ही बातमी ऐकून मला मनस्वी दुःख झाले.अतिशय हुशार बुद्धिवान दूरदृष्टी असणारा अणि विशेष म्हणजे कठोर शिस्तीचे पालन करणारा नेता हरपला. ही वेदनादायी गोष्ट आहे,अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी व्यक्त केली.
21 जून 1996 वार शुक्रवार या दिवशी दासगाव तालुका महाड जिल्हा रायगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आले होते.मी त्यावेळी महाड मध्ये शाखा अभियंता होतो. १४ वर्षे रखडले प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मी अणि माझे उपअभियंता दीक्षित आम्ही ६ महिने मध्ये पूर्ण करून घेतले होते.हे प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगराच्या कुशीत आहे. अतिशय सुरेख आणि देखणी इमारत बांधण्यात आली होती.डॉ मनोहर जोशी सर यांनी इमारत बांधकामाचे कौतुक केले .
त्यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला होता.श्री. जोशी सर यांनी माझे गोड अमृत वाणीने कौतुक केले होते..
डॉ जोशी सर यांनी मुख्यमंत्री असताना अनेक कामे केली.त्यामध्ये भुकेले अन्न यासाठी एक रुपया मध्ये झुणका भाकर, महिलाच्या लज्जा रक्षण साठी घर तिथे शौचालय माय भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरण्या साठी पाणी पुरवठा योजने साठी स्वतंत्र खाते निर्माण केले अणि भरघोस निधी सुधा उपलब्ध करून दिला. गाव तिथे पाणी पुरवठा योजना प्रभावीरित्या राबवली त्यांनी केलेल्या कार्याची लाख लाख सलाम महिला वर्ग अणि गोरगरीब जनता त्याची कायम स्वरूपी ऋणी राहील यात काही शंका नाही.या महान सुसंस्कृत शिस्त प्रिय हुशार बुद्धिमान विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध असणार्या, मधुर वाणीच्या नेत्याला महाराष्ट्र कदापि विसरणार नाही… जय हिंद..!जय महाराष्ट्र.
!!