‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत प्राथमिक गटात मसुरे देऊळवाडा प्राथमिक शाळा तर माध्यमिक गटात कट्टा येथील वराडकर हायस्कुल प्रथम

मालवण,दि.२६ फेब्रुवारी

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत मालवण तालुक्यात जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था प्राथमिक /उच्च प्राथमिक शाळांमध्ये जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा या शाळेने तर खासगी अनुदानित संस्थेच्या माध्यमिक शाळांमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कुलने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या दोन्ही शाळा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियांनातर्गत मालवण तालुक्यात प्राथमिक स्तरावरील केंद्रस्तरीय मुल्यांकनााच्या आधारे केंद्रस्तरांवर जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळेतुन (स्थानिक स्वराज्य संस्था) प्रथम क्रमांक आलेल्या व इतर व्यवस्थापनाच्या शाळेतुन प्रथम क्रमांक आलेल्या शाळांचे मालवण तालुकास्तरीय मुल्यांकन करण्यात आले. या मुल्यांकनाच्या आधारे व्यवस्थापन निहाय प्रथम तीन शाळांची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था प्राथमिक /उच्च प्राथमिक शाळांमध्ये प्रथम क्रमांक – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा, द्वितीय क्रमांक – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा, तृतीय क्रमांक – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा गोळवण नं. १ या शाळांनी यश मिळविले. तर इतर व्यवस्थापनाच्या म्हणजेच खासगी अनुदानित संस्थेच्या माध्यमिक शाळांमध्ये प्रथम क्रमांक – वराडकर हायस्कुल कट्टा, द्वितीय क्रमांक – त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे, तृतीय क्रमांक – डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कुल, देवबाग या शाळांनी यश मिळविले.