शिशुविहार काळे आजींच्या बालवाडीचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मालवण,दि.२६ फेब्रुवारी

मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये असलेल्या शिशुविहार- काळे आजींची बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन मामा वरेरकर नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाले. यावेळी बालवाडीच्या चिमुकल्या मुलांनी विविध गाण्यांवर सादर केलेली नृत्ये सर्वांची वाहवा मिळवून गेली.

या स्नेहसंमेलनाचा शुभारंभ स्व. काळे आजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी बालवाडीच्या संचालिका सौ. मालती काळे, श्रीधर काळे व इतर उपस्थित होते. या स्नेहसंमेलनात बालवाडीच्या लहान व मोठ्या अशा दोन्ही गटाच्या एकूण १२० मुलांनी सहभागी होत विविध नृत्ये सादर केली. मराठी, हिंदी गीतांवर चिमुकल्या मुलांनी थिरकत सादर केलेल्या नृत्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच विविध वेशभूषा साकारत रॅम्प वॉकही केले. या स्नेहसंमेलनाची सांगता महाराष्ट्राची लोकनृत्ये या कार्यक्रमाने होऊन यामध्ये मुलांनी वासुदेव – भूपाळी, शेतकरी नृत्य, कोळीनृत्य, दशावतार, लावणी, शिमगा, गोंधळ, वारकरी नृत्य आदी कलाप्रकार सादर करत वाहवा मिळवली.

या स्नेहसंमेलनासाठी सिद्धेश पालव, भाग्यश्री फोंडबा, सौ. केतकी सावजी, श्रेया राणे, शुभदा टिकम तसेच पालकांमधून सौ. मेस्त्री, सौ. वेंगुर्लेकर, डॉ. सौ. वालावलकर, सौ. चावरे, सौ. अवचार, सौ. केळूसकर, सौ. फाळके, सौ. कदम, सौ. सावंत, सौ. परब, जीवन धुमाळ, श्री. मंडलिक व बालवाडीच्या मुख्य शिक्षिका सौ. संस्कृती (कमल) बांदकर यांनी नृत्य दिग्दर्शन केले. तसेच मुख्य शिक्षका सौ. बांदकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलनाच्या नियोजनासाठी सहाय्यक शिक्षिका सौ. शर्वरी घाडी, निशा बिडये, सौ. प्रज्ञा राणे, सौ. शालन सावंत, माजी पालक सौ. नंदिनी गावकर यांचे सहकार्य लाभले. तर सूत्रसंचालन अभिषेक करंजेकर, मकरंद मयेकर, अभय कदम, सुधीर गोसावी यांनी केले.