राष्ट्रीय अपंग विकास महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुनील तांबे यांची निवड

कणकवली दि.२६ फेब्रुवारी(भगवान लोके)

राष्ट्रीय अपंग विकास
महासंघ-महाराष्ट्र शाखा सिंधुदूर्ग तर्फे सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून सुनील गणपत तांबे असलदे यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अपंग विकास महासंघ-महाराष्ट्र राज्य स्तरीय सभा दिनांक भाईंदर-मुंबई येथे पार पडली.
राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ. मेघाताई काळे, राज्य कार्य अध्यक्ष सुरेंद्र खरात, राज्य सचिव बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय संपर्क प्रमुख सुहास काळे यांच्या हस्ते सुनील तांबे यांना सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले.

कार्यक्रमास सर्व राष्ट्रीय कार्यकारीणी, सर्व जिल्हा प्रमुख, सर्व जिल्हा संचालक, राज्यतील सर्व अपंग बांधव , अपंग मित्र उपस्थित होते.