रोटरी क्लब वैभववाडी व नगरपंचायत यांच्यावतीने आयोजित वैभववाडी महोत्सवाची सुरुवात भव्य शोभा याञेने

0

वैभववाडी,दि.१३ जानेवारी
    रोटरी क्लब वैभववाडी व नगरपंचायत यांच्यावतीने आयोजित वैभववाडी महोत्सवाची सुरुवात भव्य शोभा याञेने करण्यात आली. वैभववाडी  संभाजी चौक ते इनामदार प्लाझा दरम्यान शोभा याञा  काढण्यात आली. शोभा याञेतील महिला ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
    या शोभा याञेत वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, यांच्यासह नगरसेवक, रोटरी वैभववाडी अध्यक्ष संजय रावराणे, माजी अध्यक्ष संतोष टक्के, प्रशांत गुळेकर, मंगेश कदम, प्रा.नामदेव गवळी, यांच्यसह रोटरीयन तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अतुल रावराणेही या शोभा याञेत सहभागी झाले होते. 
    इनामदार प्लाझा येथे भव्य मंडप उभारण्यात आला असून या मंडपाचे फित कापून नगराध्यक्षा नेहा माईणकर यांचे हस्ते उद्दघाटन करण्यात आले. तर मंडपातील खादय पदार्थांच्या स्टाॕलचे उद्दघाटन अतुल रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले.
   तर राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना नगराध्यक्षा माईणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना उपस्थितांनी अभिवादन केले.
   त्यानंतर या महोत्सवाचे खास आकर्षण ठरलेल्या रश्शी खेच स्पर्धेचे उद्दघाटन श्रीफळ वाढवून जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष शांताराम रावराणे यांचे हस्ते करण्यात आले.ही स्पर्धा पहाण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पहीला सामना नावळे संघ व गणेश नगर वैभववाडी यांच्यात झाला. अतिशय अटीतटीच्या या सामन्यात तिन पैकी दोन फे-या जिंकत नावळे संघाने सामना जिंकला.
   या महोत्सवात  पुढील दोन दिवस दररोज सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सभामंडपात विविध खादय पदार्थाचे स्टाॕल उभारण्यात आले असून उपस्थित आपल्या आवडीनुसार या स्टाॕलवरील पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत होते. कार्यक्रमाचे सूञसंचलन विदयाधर सावंत यांनी केले.