दारिस्ते गावचे सुपूत्र श्रीकांत ठाकूर यांची भारतीय लष्कारात

श्रीकांत ठाकूर दारिस्ते गावी येताच जल्लोषी स्वागत; भारत माता की जय.ची जोरदार घोषणा

कणकवली दि.२६ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावचे सुपूत्र श्रीकांत शत्रुघ्न ठाकूर यांची भारतीय लष्कारात निवड झाली आहे.त्याबद्दल गावात ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढत स्वागत केले.तसेच श्रीकांत ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीकांत ठाकूर यांचे स्वागत करण्यासाठी फुलांनी सजवलेली बैलगाडी, घरासमोर रांगोळ्यांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी, औक्षण, फुलांचा वर्षाव, ढोल ताशांचा गजर करीत स्वागत करण्यात आले.यावेळी भारत माता की जय.. च्या जोरदार घोषणा ग्रामस्थांनी दिल्या.दारिस्ते गावातील पवारवाडी आणि नमंसवाडी दुमदुमली होती.

दारिस्ते गावचे सुपूत्र श्रीकांत शत्रुघ्न ठाकूर यांची भारतीय लष्कारातील नियुक्ती झाल्याबद्दल स्वागत झाले. त्यावेळी श्रीकांत ठाकूर यांचा सत्कार युवासेना तालुकाप्रमुख उत्तम सुरेश लोके यांचा हस्ते करण्यात आला. त्यावेळीं उत्तम लोके यांनी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.यावेळी श्रीकांत ठाकूर म्हणाले, मेहनतीचे चीज झाले आहे. माझ्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले आहे.मला मार्गदर्शन केलेल्या सर्व गुरुजनांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.