कणकवली दि.२६ फेब्रुवारी(भगवान लोके)
मठाधिपती प.पू. सदगुरु गावडेकाका महाराज” यांच्या संकल्पनेतुन व प्रेरणेतून साकारलेल्या कणकवली नाडकर्णी नगर येथील “श्री स्वामी समर्थ उपासना केंद्राचा बारावा वर्धापन दिन सोहळा मंगळवार २७ फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने सकाळी ७ वा. स्वामी पादुका पुजन, सकाळी ८ वा. श्री सत्यनारायण महापुजा, सकाळी १०.३० वा.सद्गुरुंची पाद्यपुजा, सकाळी ११.३० वा. प.पु. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांचे मार्गदर्शन, दुपारी १२.३० वा. सामुदायीक नैवेद्य अपर्ण, दुपारी १ वा.महाप्रसाद,सायं ४ वा. हळदीकुंकु समारंभ, सायं ६.३० वा. दीपोत्सव, सायं ७ वा. आरती असे कार्यक्रम होणार आहेत.तरी या सोहळ्यास सर्वानी उपस्थित राहून स्वामीच्या कृपाशीर्वाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा अशी आवाहन करण्यात आले आहे.