बांगलादेशी नागरिकांचे सिंधदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून त्यांचे साथीदार आहेत का?

सिंधुदुर्ग पोलिसांनी कसून चौकशी करावी; अटक केल्याबद्दल आमदार नितेश राणें यांनी केले पोलिसांचे कौतुक

कणकवली दि.२६ फेब्रुवारी (भगवान लोके)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा व आरोंदा या दोन ठिकाणी शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी छापा मारून १० बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्याबद्दल भाजपा आमदार नितेश राणेंनी सिंधुदुर्ग पोलिसांचे पत्र पाठवत कौतुक केलं आहे.तसेच बांगलादेशी नागरिकांचे सिंधदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून त्यांचे साथीदार आहेत का?याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

बांगलादेशी नागरिकांची कसून तपासणी करून त्यांनी भारतात प्रवेश कसा केला? या कामी त्यांना कोणी मदत केली? ‘त्यांचे साथीदार कोण? सिंधदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून त्यांचे साथीदार आहेत का? त्याचप्रमाणे बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करण्यामागे त्यांचा हेतु काय होता? या दृष्टीने तपास करून जनतेच्या मनातील निर्माण झालेली भिती दूर करावी, याबाबत कसून चौकशी करावी अशी मागणी आमदार नितेश राणेंनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.