कणकवली दि .२६ फेब्रुवारी(भगवान लोके)
कणकवली पोलीस ठाण्याच्या रिक्त प्रभारीपदी सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार पुन्हा स्वीकारला आहे.
मनोज पाटील हे कणकवली पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पोलिस निरीक्षक अमित यादव यांची बदली झाल्यानंतर मनोज पाटील यांनी कणकवली पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर अलीकडेच रिक्त असलेल्या देवगड पोलिस ठाणे प्रभारी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी त्यांच्या नियीक्तीचे आदेश काढले होते. त्यानुसार पाटील यांनी देवगड पोलिस ठाण्याचा प्रभार स्वीकारला होता.आता कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांची ठाणे ग्रामीण येथे बदली झाली आहे.त्यामुळे त्यांच्या रिक्त पदावर प्रभारीपदी सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.