भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

0

मालवण,दि.१३ जानेवारी

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्त सकाळच्या सत्रात कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एच. बी. तिवले हे होते यावेळी प्रा. जी.टी. दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर प्रा. आर. आर. बांदेकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याचा आढावा घेताना युवा दिनाचे महत्व स्पष्ट केले. प्रा. स्नेहल पराडकर यांनी आभार मानले.

दुपारच्या सत्रात भंडारी हायस्कुलच्यावतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यापक एच. बी. तिवले यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहाय्यक शिक्षिका सुनंदा वराडकर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. यावेळी सौ. अस्मिता वाईरकर, ए. एस.चव्हाण मॅडम, सौ. ज्योती रेवणकर, कलाशिक्षक श्री. गोसावी, विलास वळंजू आदी उपस्थित होते. सौ.वाईरकर यांनी आभार मानले