आंबोली,दि.२६ फेब्रुवारी
आंबोली येथील घाटात ऐअरटेल कंपनीची केबल टाकताना घाट रस्तावर दरीकडे पाणी जाण्यास कोणतीही वाट न ठेवल्याने रस्त्यावर पूर्णपणे पाण्याची कोंडी होऊन घाट पुन्हा कोसळण्याची शक्यता आहे.सार्वजनिक बांधकाम अधिकारी विजय चव्हाण यांनी ठेकेदार राऊळ आणि मुकादम राठोड याना काम बंद करण्याच्या सूचना देऊनही काम बंद केले नाही.त्यामुळे संबंधित कामाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करावी ,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे.
आंबोली घाटात दरीच्या बाजूने कठड्याला लागून केबल टाकून काँक्रीट घालण्यात येत आहे. मात्र कठड्याच्या मोरीच्या मध्ये एक फुटाची गॅप ही रस्त्यातील पाणी खाली जाण्यासाठी आहे मात्र या ठिकाणी हलगर्जी पणा करून ठेकेदाराने पूर्ण घाटात दरीच्या बाजूने काँक्रीट घालून पाणी जाण्यासाठी वाटच ठेवली नसल्याने रस्त्यात पाणी तुंबून पुन्हा घाट रस्ता कोसळू शकतो तसेच रस्ता देखील कमी झाला आहे. संबंधित केबल टाकताना पाणी जाण्यासाठी अंतर ठेवलेले नाही तसेच ही केबल कठड्यावरून गेली असती आणि वरून काँक्रीट घातले असते तर कोणताही धोका नहोता त्यामुळे हलगर्जी पणा या ठिकाणी दिसून येतो.काल बांधकाम विभाग अभियंता चव्हाण यांना बोलावून पाहणी केली असता त्यांनी संबंधित ठेकेदार आणि मुकादम याला काम बंद करा असे सांगितले असताना देखील त्याने काम बंद केले नाही त्यामुळे पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती आहे.त्यामुळे या कामाची तात्काळ पाहणी करा अन्यथा संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा आंबोली ग्रामस्थानी दिला आहे.तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यास त्यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा दिला आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग पाणी जाण्यास कोणतीही वाट न ठेवल्याने रस्त्यावर पूर्णपणे पाण्याची कोंडी होऊन घाट...


