सावंतवाडी,दि.२७ फेब्रुवारी
येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक, सहकार क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे अभिमन्यू लोंढे यांना नुकताच मानाचा ज्ञानदीप पुरस्कार जाहीर झाला याबद्दल त्यांचे कुस्ती क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मल्ल सम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या योगदानाची दखल घेऊन शहरातील ज्ञानदीप शैक्षणिक सेवा मंडळाने त्यांना २०२४ सालाचा ज्ञानदीप पुरस्कार जाहीर केला. त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी मलासम्राट प्रतिष्ठानचे व ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सचिव ललित हरमलकर, खजिनदार गौरव कुडाळकर तसेच ज्येष्ठ कलावंत रामदास पारकर, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे तसेच मल्लसम्राट प्रतिष्ठानचे सदस्य दादू हरमलकर, दशरथ गोंद्याळकर, नागेश सूर्यवंशी, किशोर हरमलकर, देवेश पालव, योगेश रावल, कुणाल परब, फिझा मकानदार, कामाक्षी महालकर आदी उपस्थित होते.