ओंकार कलामंचाच्या वतीने आयोजित “रिल्स्” स्पर्धेचे उद्या बक्षीस वितरण…

सावंतवाडी,दि.२७ फेब्रुवारी

अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ओंकार कलामंचाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष रामलल्लाचा” या कार्यक्रमातील “महालक्ष्मी तथास्तु मॉल” प्रस्तुत रिल्स् स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्या ता. २८ ला सायंकाळी ४ वाजता येथील महालक्ष्मी तथास्तू मॉल मध्ये होणार आहे.
यावेळी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अ‍ॅड. विक्रम भांगले, सावंतवाडी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंखे आदी उपस्थित राहणार आहे
अयोध्या सोहळ्याचे औचित्य साधून येथील श्रीराम वाचन मंदिर समोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेशभुषा, रिल्स् आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात रिल्स् स्पर्धेत साईश गावडे प्रथम, पार्थ सावंत द्वितीय, केतन कुलकर्णी तृतीय तर यत्वेश राऊळ यांना उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तर वेशभुषा स्पर्धेत काव्या गावडे प्रथम, श्रावणी आरोंदेकर आणि क्षमिका आरोंदेकर विभागून द्वितीय तर गौरव केळणेकर याला तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला होता. रांगोळी स्पर्धेत सायली भैरे प्रथम, पुर्वा चांदरकर द्वितीय, जेसिता गोम्स आणि स्वरा हरम तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. यावेळी यश संपादन करणार्‍या स्पर्धकांना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. यावेळी सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन ओंकार कलामंचाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.