मसुरे,दि.२६ फेब्रुवारी(झुंजार पेडणेकर)
बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहान गटांमध्ये प्रांजल आईर, मध्यम गटामध्ये मयूर परब तर मोठा गटामध्ये शर्वरी परब हीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे आहे. लहान गट (एक ते चार) प्रथम प्रांजल सतीश आईर, द्वितीय ध्रुव राजेश जाधव, तृतीय प्रणव निलेश पवार. मध्यम गट (पाच ते सात) मयूर परब, पूजा आईर, आणि तृतीय आदित्य किरण पवार. मोठा गट (८वि ते 9 वि) प्रथम शर्वरी प्रशांत परब, द्वितीय वैष्णवी संदीप आईर, तृतीय ऐश्वर्यन तुषार परब यांनी यश प्राप्त केले. स्पर्धेचे परीक्षण महेश चव्हाण, राजेश जाधव, आणि केंद्रप्रमुख नारायण देशमुख यांनी केले. यावेळी अंगणवाडी ते नववीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना कै. जगन्नाथ भगवान परब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मनोहर परब यांच्याकडून शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी बांदिवडे ग्रामस्थ संघाचे अध्यक्ष आनंद परब, उदय सावंत, अजय घाडीगावकर, प्रफुल्ल प्रभू, उमेश परब, शंकर आईर, सुनील घाडी, प्रशांत परब, संदीप घाडी, प्रकाश घाडीगावकर, दिनेश परब, सतीश आईर, प्राची परब, स्वाती आईर, मयुरी राणे, वैष्णवी घाडीगावकर, अनिल परब, चंद्रकांत परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आभार रामचंद्र माळकर यांनी मानले.