ग्रामीण भागातील जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा निश्चितपणे कौतुकास्पद-पत्रकार दयानंद मांगले

वानीवडे येथील ग्रा प सभागृहात आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराचे उदघाटन

देवगड,दि.२६ फेब्रुवारी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित विजय क्रीडा मंडळ भांडुप यांच्या सौजन्याने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वानिवडें येथील ग्रामीण भागात आयोजित केलेले मोफत नेत्र चिकित्सा शिबिर हे निश्चितपणे ग्रामीण भागातील जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा निश्चितपणे कौतुकास्पद असून अशा पद्धतीचे उपक्रम यापुढील काळात देखील ग्रामीण भागातील नागरिकांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेला याचा लाभ होईल तसेच मराठी गौरव दिनानिमित्त मराठी भाषा वापर करीत समाजात कार्य करीत असलेल्या व्यक्तींचा गौरव ही बाब कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार दयानंद मांगले यांनी वानीवडे येथे बोलताना केले.
वानीवडे येथील ग्रा प सभागृहात आयोजित केलेल्या या शिबिराचे उदघाटन वानिवडे ग्रामपंचायत सरपंच सुयोगी घाडी व प्रमुख पाहुणे दयानंद मांगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवरायांना अभिवादन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच सौ. मेघा
सरवणकर ,विजय क्रीडा मंडळ .भांडुप चे अध्यक्ष संतोष कासले , तालुका अध्यक्ष संतोष मयेकर वैद्यकीय अधिकारी,डॉ. जे. एस. यादव नेत्र चिकित्सक डॉ.दत्ताराम कोरडे, मनसे शाखाध्यक्ष मनोज तांबे, महिला अध्यक्षा सुहासिनी प्रभू , सौ अर्पिता राघव ,सुधीर मुळीक, प्रवीण मयेकर, बबलू परब उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण मयेकर यांनी करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष मयेकर यांनी केले. सरपंच सुयोगी घाडी यानी मनसे च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले नेत्र चिकित्सा व आरोग्य तपासणी शिबीर हा उपक्रम स्तुत्य आहे.असे सांगून शुभेच्छा व्यक्त केल्या . या शिबिराचा ८० रुग्णांनी लाभ घेतला.
या निमित्ताने पत्रकार दयानंद मांगले ,देवगड,शिक्षिका सौ.देवांगी परब महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार
.आनंद कदम मुख्याध्यापक,आदर्श विद्यामंदीर ,किंजवडे. शिवराज पुट्टेवाड जिल्हा परिषद शाळा
किंजवडे – डोबवाडी याना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .