कणकवली दि.२७ फेब्रुवारी(भगवान लोके)
कणकवली तहसिलदार कार्यालयातील तहसिलदार व इतर अधिका-यांना कार्यालयीन कामासाठी अत्यावश्यक असलेले शासकीय वाहन गेले अनेक दिवस उपलब्ध नव्हते. त्यामुळे शासनाकडे नव्या वाहनासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी कणकवली तहसिलदाराना कार्यालयीन उपयोगासाठी नवी कोरी महिंद्रा बोलेरो कार शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
त्यामुळे कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे व अन्य अधिका-यांची वाहनाअभावी होणारी गैरसोय आता थांबणार आहे. जिल्ह्यात इतर तालुक्यातही शासकीय वाहन उपलब्ध झाले आहे.